आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Latest News Kashmir Is A Flashpoint Can Trigger A Fourth War Pakistan And India Nawaz Sharif

काश्मीर प्रश्न सोडविला नाही तर भारतासोबत चौथे युद्ध, नवाज शरीफ यांची धमकी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद - जम्मू-काश्मीरमध्ये भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी कलम 370 वर चर्चा करण्याची मागणी केली, त्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी काश्मीर मुद्दा लवकरात लवकर सोडवावा अन्यथा भारत-पाक चौथे युद्ध छेडले जाईल असे म्हटले आहे. पाकिस्तानचे आघाडीचे वृत्तपत्र 'डॉन'मध्ये हे वृत्त प्रकाशित झाले आहे. त्यात शरीफ यांनी म्हटले आहे, की काश्मीर एक असा मुद्दा आहे ज्यावरून दोन्ही अण्वस्त्र सज्ज देशांमध्ये कधीही चौथे युद्ध होऊ शकते. त्यामुळे युद्धाची परिस्थिती निर्माण होण्याआधी हा मुद्दा आपण सोडवला पाहिजे. माझे स्वप्न आहे की माझ्या ह्यातीतच काश्मिर प्रश्न सुटला पाहिजे.
डॉनच्या वृत्तानुसार, शरीफ यांचा भारतावर आरोप आहे, की काश्मीर प्रश्नावर भारत गंभीर नाही. ते म्हणाले, भारत सरकार वारंवार जम्मू-काश्मीर आपला अविभाज्य भाग असल्याचे सांगून या प्रश्नाचे गांभीर्य कमी करीत आहे.