आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुर्दैव दुर्दैव; फिलिपाईन्समध्ये तांदूळ लुटताना चेंगराचेंगरीत 8 ठार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टॅकलोबान (फिलिपाईन्स)- मध्य फिलिपाईन्समधील टॅकलोबान शहरातील शासकीय गोदामातून तांदूळ लुटून नेताना झालेल्या चेंगराचेंगरीत 8 नागरिकांचा मृत्यू झाला असून अनेक जखमी झाल्याचे वृत्त आहे. फिलिपाईन्समध्ये आलेल्या "हैयान" चक्रीवादळात हजारो लोकांचा मृत्यू झाला असून लाखो बेघर झाले आहेत. बेघर लोकांना खायला अन्न आणि प्यायला पाणीही उपलब्ध नसल्याचे दिसून येत आहे.
फिलिपाईन्सच्या राष्ट्रीय अन्न प्राधिकरणाचे प्रवक्ते रेक्स इस्तोपेरेझ म्हणाले, की शासकीय गोदामातून तांदूळ लुटून नेण्यासाठी लोकांनी अचानक हल्ला केला. यावेळी पोलिस आणि लष्कराने जवान तेथे होते. परंतु, त्यांनाही ही लुटालूट किंवा चेंगराचेंगरी रोखता आली नाही. यावेळी लोकांनी तब्बल 1 लाख पोती तांदूळ लुटून नेला. या गोदामाची एक भींत कोसळल्याने त्याखाली 8 जणांचा मृत्यू झाला.
चक्रीवादळामुळे टॅकलोबान शहरातील रस्त्यांवर ठिकठिकाणी मृतदेह पडलेले आहेत. त्यांची विल्हेवाट लावणे सरकार आणि लष्कराच्या जवानांपुढे एक मोठे आव्हान झाले आहे.
टॅकलोबान शहारीतील काही फोटो, पुढील स्लाईडवर....