आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Latest News Russian Couple Use Webcam To Broadcast Live Sex On Ps4

सोनी प्लेस्टेशन वादाच्या भोवर्‍यात; 20 मिनिटे ब्रॉडकास्ट झाला अश्लील व्हिडिओ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'सोनी प्लेस्टेशन' पुन्हा एकदा वादाच्या भोवर्‍यात सापडले आहे. 'प्लेस्टेशन 4 च्या 'चॅटरुम'मध्ये एका रशियन जोडप्याचा अश्लील व्हिडिओ प्रसारीत झाल्यामुळे खळबळ माजली आहे. तब्बल 20 मिनिटे प्रसारित झालेला हा आक्षेपार्ह व्हिडिओ हजारो युजर्संनी पाहिला.
सोनी कंपनीने गेमिंग प्लेस्टेशनमध्ये व्हिडिओ चॅटिंगची सुविधा दिली आहे. या सुविधेचा वापर गेम खेळणारे युजर्स आपापसात चॅटिंग करण्यासाठी करतात. सोनीच्या चॅटिंग सुविधेचा वापर संपूर्ण जगात केला जातो. प्लेरुम ब्रॉडकास्टमध्ये प्रसारित होणारे व्हिडिओ कोणत्याही वयातील युजर्स पाहू शकतात.
'डेली मेल'मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार सोनीच्या प्लेस्टेशनवर प्रसारित झालेल्या व्हिडिओतील कथत जोडपे हे रशियातील आहे. 20 मिनिटे चाललेला त्यांचा प्रणय जवळपास एक हजार युजर्सने पाहिला. अनेकांनी या व्हिडिओवर हरकतीही नोंदविल्या आहेत.

दरम्यान, गेल्या वर्षी प्लेस्टेशन लॉन्च झाल्यानंतर काही दिवसांनी एका युजरने नशेत तर्रर्र झालेल्या पत्नीचा व्हिडिओ लाइव्ह स्ट्रीम करून खळबळ माजवून दिली होती. लाइव्ह स्ट्रीमिंगदरम्यान पत्नीचे कपडे उतरवणार्‍या युजरवर सोनीने प्रतिबंध घातले आहेत.
गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये लॉन्च झालेल्या सोनी प्लेस्टेशन 4 चे सुमारे 4.2 मिलियनपेक्षा जास्त सेटची विक्री झाली आहे.
सविस्तर वृत्त वाचण्यासाठी पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करा..