आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Latest News US Grated To Narendra Modi By Free To Apply For Visa

नरेंद्र मोदींसाठी अमेरिकेची कवाडं झाली खुली; व्हिसासाठी मिळाली परवानगी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन- भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार आणि गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींसाठी आता अमेरिकेची कवाडं खुली झाली आहे. अमेरिका प्रशासनाने मोदींना व्हिसासाठी अर्ज करण्याची परवानगी दिली आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते मेरी हर्फ यांनी याबाबतची माहिती दिली.
हर्फ म्हणाले, अमेरिकन प्रशसनाने मोदींना व्हिसाचे स्वातंत्र्य दिले आहे. अमेरिकेच्या नियमांनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. मोदी आता व्हिसासाठी अर्ज करू शकतात. परंतु, त्यांच्या अर्जाचा एका सामान्य अर्जदारांप्रमाणे विचार करून निर्णय घेण्यात येणार असल्याचेही हर्फ यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, गुजरातमध्ये 2002 साली उसळलेल्या दंगलीनंतर अमेरिकेने 2005 मध्ये मोदींना व्हिसा देण्यास नकार दिला होता.
अमेरिकेने या कारणांमुळे नाकारला होता व्हिजा; वाचा पुढील स्लाइड्‍सवर...