आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Leaked Files Of Britam Defense Implicate The Plot Against Russia And Syria

अमेरिका सिरियावर रासायनिक अस्त्रांचा हल्ला करण्याची शक्यता

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

व्हाईट हाऊसने सिरियावर रासायनिक अस्त्रांच्या आक्रमणाला परवानगी दिली असल्याचे एका लिक झालेल्या ई-मेलने स्पष्ट केले आहे. या हल्ल्याची जबाबदारी सिरियाचे अध्यक्ष असाद यांच्यावर टाकण्याचीही शक्यता आहे. सिरीयामधील अंतरराष्ट्रीय लष्कराला चिथावणी देण्याचाही त्यामागे उद्देश आहे.

ब्रिटनमधील 'ब्रिटम' (जोखीम व्यवस्थापन आणि संरक्षण सल्लागार) या संस्थेला दोन वरीष्ठ अधिका-यांचे मेल लिक झाल्यामुळे या गुप्तवार्तेची माहिती मिळाली. या मेल मध्ये 'वॉश्गिंटन'ने एका योजनेला संमती दिली आहे, ज्याद्वारे सिरियाविरोधात रासायनिक अस्त्रांचा वापर करण्यात येईल. यासाठी 'कतार' तेथील विद्रोही सैन्याला आर्थिक मदत करले, असे म्हटले आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी गेल्या महिन्यातच सिरियाचे अध्यक्ष बशर-अल-असाद यांना स्पष्ट सांगितले होते की, सिरायाच्या लोकांविरोधात कोणत्याही रासायनिक हत्यारांचा वापर अमेरिका खपवून घेणार नाही.

'सायबर वॉर न्यूज'च्या वृत्तानुसार, हा मेल मलेशियाच्या एका हॅकरने हॅक केला होता. अमेरिकेने या संपूर्ण प्रकरणाबद्दल बोलण्यास नकार दिला आहे.