आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शरीर रचना शिकण्‍यासाठी प्रत्यक्ष माणूस उभा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

विद्यार्थ्यांना एखादा विषय आवडण्यासाठी त्यातील नव्या रचनात्मक गोष्टी अभ्यासक्रमात समाविष्ट केल्या जातात. ऑस्ट्रेलियातील आरएमआयटी विद्यापीठाचे प्राध्यापक डॉ. क्लाऊडिया डियाज यांनी शरीर रचनाशास्त्र शिकवण्यासाठी अशीच एक युक्ती शोधून काढली आहे. येथील मुलांना लाइव्ह मॉडेलवरून शास्त्र शिकवले जाते. छायाचित्रात दिसणारा जॅक नावाचा मॉडेल आहे. आरएमआयटी विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठी जॅक 18 तासांच्या प्रकल्पासाठी कॅनव्हासचे रूप घेऊन उभा आहे. आयपॅडमध्ये पाहून विद्यार्थी जॅकच्या शरीरावर काळ्या रंगाने एक एक मांसपेशी काढत आहेत. मानवी पेशींचे जाळे लवकर लक्षात येण्यासाठी ही पद्धत वापरण्यात आली आहे.


laughingsquidcom