आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुनामीमुळे उद्ध्वस्त कारखान्यांत बनले इनडोअर एलईडी फार्म

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
2011 मध्ये जपानमध्ये आलेल्या सुनामीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. या सुनामीचा परिणाम त्या जागतिक कंपन्यांवर झाला होता, ज्यांचे उत्पादन प्रामुख्याने जपानमध्ये होत होते. यामध्ये सोनी कंपनीचा प्रामुख्याने समावेश होता. त्यांचे सेमी कंडक्टर मियामी राज्यात बनतात. सुमारे 25 हजार चौरस फूट लांबी-रुंदी असलेल्या मशिनरीचा प्लँट फिजिओलॉजिस्ट शिगेहारू शिमापुरा यांनी पूर्णत: बदलला. त्यांनी येथे जगातील सर्वात मोठे इनडोअर फार्म बनवला असून ते 17500 इलईडीमध्ये उजळून निघाले आहे. या प्लँटसाठी खास एलईडीची निर्मिती जनरल इलेक्ट्रॉनिक्सनी केले आहे. याच महिन्यात हे काम पूर्ण झाले असून येथे पहिल्याच दिवशी 10 हजार लॅटिस या सॅलॅडच्या पानांचे उत्पादन होते. या पानांच्या चमत्कृतिपूर्ण उत्पादनासाठी एलईडीचे मोठे सहकार्य मिळते. याच्या साह्याने रात्रंदिवस प्रकाशाचे चक्र सोपे जाते, असे शिमापुरा यांनी सांगितले. त्यानुसार येथे वापरल्या गेलेल्या तंत्राच्या आधारे आऊटडोअर फार्मच्या तुलनेत अडीचपट जास्त लेटिसचे उत्पादन क रणे शक्य होते. हे पान व्हिटॅमिन आणि मिनरल्सनी भरपूर आहे. याचा वापर जपानसह अन्य देशांतही प्रामुख्याने सॅलॅडमध्येच वापर केला जातो. म्हणूनच याची सोशल मीडियावर चर्चा होते.
highsnobiety.com