छायाचित्र - डावीकडून इ. आकासाकी, हिरोशी अमानो आणि शुजी नाकामुरा
स्टॉकहोम - जगाला स्वस्त प्रकाश म्हणजे एलईडीची(लाइट एमिटिंग डायोड) देणगी देणारे जपानचे इसामू आकासाकी, हिरोशी अमानो व अमेरिकेचे शुजी नाकामुरा या शास्त्रज्ञांना भौतिकशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला. रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सने मंगळवारी ही घोषणा केली. सध्या एलईडी भलेही महाग असला तरी त्यामुळे वीज बिल कमी येते. त्यामुळे ते किफायतशीर तसेच पयार्वरण पूरकही आहेत.
* इ. आकासाकी (85)
मेईजी आणि नागोया विद्यापीठात प्राध्यापक
* हिरोशी अमानो (54)
नागोरा विद्यापीठात प्राध्यापक
* शुजी नाकामुरा (60)
कॅलिफोर्निया विद्यापीठात प्राध्यापक
जगाला फायदा काय?
सर्वसाधारणपणे एका बल्बच्या तुलनेत एलईडी ७० ते ७५ टक्के वीज बचत करतो. बल्बपेक्षा जास्त प्रकाश देतो आणि प्रदूषणही कमी होते.
रसायनशास्त्राचे नोबेल आज
वैद्यकशास्त्र आणि भौतिकशास्त्रानंतर बुधवारी रसायनशास्त्राच्या नोबेल पुरस्काराची घोषणा होणार आहे.
एलईडीमुळे मिळतो निळा प्रकाश
एलईडी निळा प्रकाश देणारा डायोड आहे. पण हा निळा प्रकाश डायोडच्या आतच असतो. डायोडच्या बाहेर
आपल्याला पांढरा प्रकाश दिसतो. तिन्ही वैज्ञानिकांनी १९९० च्या दशकात सेमीकंडक्टरपेक्षा जलद निळा प्रकाश तयार करून प्रकाश तंत्रज्ञानाचे रूपांतर केले होते. त्यामुळे डोळ्यांना न खुपणारा पांढरा प्रकाश मिळाला. या शोधासाठी इतर वैज्ञानिकांनी अनेक दशके संघर्ष केला होता.