आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Ledy Teacher Died In The Firing In Pakistan;s Khaibar Region

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाकिस्तानात खैबर प्रांतात शिक्षिकेवर गोळीबार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद - वायव्य पाकिस्तानातील खैबर प्रांतात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात एक महिला शिक्षिका ठार झाली. शाहनाझ नाझली असे या शिक्षिकेचे नाव असून त्या शाळेत जात असताना मोटारसायकलवरून आलेल्या दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. शाहकस भागात मंगळवारी ही घटना घडली. महिलेवर हल्ला केल्यानंतर दहशतवादी घटनास्थळाहून पलायन करण्यात यशस्वी ठरले. गोळीबार झाल्यानंतर शाहनाझ या गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.आतापर्यंत कोणत्याही गटाने हल्ल्याची जबाबदारी घेतली नाही. मात्र महिला शिक्षणास विरोध करणा-या तालिबानी संघटनेचा यामागे हात असावा असे मानले जाते. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये 15 वर्षीय मलाला युसूफझाईला दहशतवाद्यांनी लक्ष्य केले होते.