डेन्मार्कची प्रख्यात खेळणी बनवणारी कंपनी लेगोने ग्रीनपीसचे व्हायरल झालेले व्हिडिओ पाहून शेल ऑयलशी असलेले ५० वर्षांपासूनचे संबंध तोडले. लेगोने या कंपनीने ६६० कोटींची डील धुडकावून लावली. एव्हरीथिंग इज नॉट ऑसम या व्हिडिओमध्ये आर्कटिकची जमीन हळूहळू तेलात बुडते आहे. तेथे बोअर घेतल्याने असे घडते आहे. यामुळेच लेगो आर्कटिकला बोअर पाडण्याविरोधात मोहीम सुरू करत आहे.
ग्रीनपीसच्या व्हिडिओला १० लाखांहून अधिक लोकांचे समर्थन मिळाले आहे. व्हिडिओमध्ये एक संदेश असून शेल आमच्या मुलांचे भावविश्व दूषित करत असून लेगोने पर्यावरणासाठी योग्य जबाबदारी घेतली पाहिजे.
act.greenpeace.org