आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Lets Change, Some You, Some We Modi Appeal 17 American Companies CEO

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बदलूया; थोडे तुम्ही, थोडे आम्ही - १७ अमेरिकी कंपन्यांच्या सीईओंना मोदींचे आवाहन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क - भारतवंशीयांची मने जिंकल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी अमेरिकेच्या कॉर्पोरेट जगताशी भेटले. राष्ट्राध्यक्ष ओबामांना भेटण्याआधी मोदींनी १७ बड्या कंपन्यांच्या सीईओंसोबत संवाद साधला. कंपन्यांच्या मागण्यांनुसार सरकारच्या धोरणांत आम्ही बदल करू, मात्र थोडे तुम्हालाही बदलावे लागेल, असे म्हणत मोदींनी त्यांना भारतात गुंतवणूक करण्याचे आमंत्रण दिले. जास्तीत जास्त रोजगारनिर्मिती व्हावी म्हणून मोदींनी पायाभूत आराखडा क्षेत्रावर अधिक भर दिला.

चर्चेदरम्यान कोळसा घोटाळ्याचाही उल्लेख झाला. त्यावर मोदी म्हणाले, विश्वास ठेवा, आम्ही या निकालाचे संधीत रूपांतर करून दाखवू. अमेरिकी कंपन्यांना जे काही बदल हवे असतील, त्यावर सरकार विचार करेल. देशात व्यवसायासाठी पोषक वातावरण निर्माण केले जाईल. मेक इन इंडिया मोहिमेअंतर्गत मोदींनी या कंपन्यांना भारतात गुंतवणूक करण्याचा आग्रह केला.

सर्व सीईओ खुश! म्हणाले, पुढील दशक भारताचेच
पेप्सी : ८.६१ लाख कोटींच्या कंपनीच्या इंद्रा नुई - पंतप्रधानांनी आमची चिंता विचारात घेतली. आपले प्राधान्यक्रमही सांगितले. त्यांचे संपूर्ण लक्ष देशाच्या विकासावर आहे.
मास्टर कार्ड: ५.३५ लाख कोटींच्या कंपनीचे अजय बंगा - मोदी कौशल्यविकास व पर्यटनावर भर देऊ इच्छितात. खरोखरच पुढील दशक भारतासाठी चांगले राहील.
जीई: १५.८० लाख कोटींच्या कंपनीचे जेफरी इमेल्ट - गुंतवणुकीच्या दृष्टीने भारत उत्तम देश आहे. आमची गुंतवणूक आणखी वाढणार आहे.
बोइंग : ५.७१ लाख कोटींच्या कंपनीचे जे. मॅकनर्नी - भारतात माझ्या कंपनीचा व्यवसाय आधीपासूनच आहे. पीएमशी भेटल्यानंतर तो वाढवण्यावर आम्ही आणखी भर देऊ
आयबीएम : १२.१७ ला कोटींच्या कंपनीचे रोमेटी - आम्ही स्मार्ट सिटी व डिजिटल इंडिया प्रकल्पात काम करण्यास इच्छुक आहोत. मोदींकडे त्याची स्पष्ट रूपरेखा आहे.
ब्लॅक रॉक : ३.३८ कोटींच्या कंपनीचे फिंक आम्ही गुंतवणुकीसाठी पुढील वर्षी भारतात गुंतवणूकदार परिषद घेऊ.

मोदी-ओबामा भेट
सीईओंसोबतच्या बैठकीनंतर मोदींनी न्यूयॉर्कमध्येच माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन व त्यांची पत्नी हिलरी यांची भेट घेतली. यानंतर ते ओबामांची भेट घेण्यासाठी वॉशिंग्टनला रवाना झाले.
(छायाचित्र : पेप्सीच्या सीईओ इंद्रा नुई व मोदी.)