आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lets Go, Harry Potter Magic Purchase Through Online

चला, हॅरी पॉटरच्या जादुई बाजारात ऑनलाइन खरेदीला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - हॅरी पॉटरच्या चाहत्यांसाठी खुशखबर. हॅरी पॉटर सिनेमातील डियागॉन गल्ली आठवतेय? अगदी बरोबर. जिथे जादुई करामती करण्याचे साहित्य विक्रीला ठेवलेली अनेक दुकाने आहेत. त्याच दुकानांचा तुम्हाला एका क्लिकवर वेध घेणे शक्य होणार आहे.


गुगल मॅपने त्यांच्या युजर्ससाठी ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. चित्रपटातील ही बाजारपेठ वास्तवात लंडनमधील वॉर्नर ब्रदर्स स्टुडिओमध्ये साकारलेली आहे. तेथील रस्त्यांचा माग गुगल मॅपवरून सहजपणे काढता येणार आहे. या गल्लीत अनेक दुकाने आहेत. ऑनलाइन भेट देणा-या चाहत्यांना ऑलिव्हांडर्स वँड शॉपलाही भेट देता येणार आहे. त्याशिवाय विसलीज विझार्ड व्हिझेस जोक शॉपही पाहता येणार आहे. या गल्लीबोळातील बाजारपेठेचा सेट उभारण्यासाठी निर्मात्यांना तीन महिने लागले होते. येथील दुकानांतून 20 हजारांवर उत्पादने मांडण्यात आलेली आहेत. जादुई साहित्याच्या विक्रीची ही बाजारपेठ पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात आलेली आहे.