आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Liberia: Doctor Given Experimental Ebola Drug Dies, Divya Marathi

Ebola Virus: इबोला औषध घेणा-या डॉक्टरचा लायबेरियात मृत्यू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाईल छायाच‍ित्र)
मोन्रोव्हिया( लायबेरिया) - इबोलाचे औषध घेणारा लायबेरियन डॉक्टरचा मृत्यू झाल्याचे सोमवारी (ता.25) सरकारने सांगितले. चाचणी न घेतलेल्या औषधाची लस पश्चिम आफ्रिकेत पाठवण्‍यात आली होती, असे कॅनडाने यावेळी स्पष्‍ट केले. आतापर्यंत इबोलाने 1 हजार 400 लोकांचा बळी घेतला आहे. त्यामुळे आता तातडीने संसर्गजन्य रोगावर प्रभावी उपचार पध्‍दती शोधण्‍याची गरज आहे.
प्रायोगिक लस अद्यापही कॅनेडियन प्रयोगशाळेतच आहे, असे कॅनडाच्या सार्वजनिक आरोग्य संस्थेचे प्रवक्ते पॅट्रीक गॅबेल यांनी सांगितले. यावेळी लायबेरियात पाठवण्‍यात आलेल्या इबोलाच्या औषधाची मुदत सां‍गण्‍यास प्रवक्त्यांने नकार दिला. सध्‍या जा‍गतिक आरोग्य संघटनेबरोबर औषधावर काम चालू आहे. ते आणखी कसे सुरक्षित वापरले जाईल याकडे लक्ष दिले जाणार आहे, असे गॅबेल यांनी सांगितले.

या महिन्याच्या सुरुवातीला 800 ते 1,000 विकसित केलेले इबोला लस देण्‍यात आल्याचे, कॅनडाने सांगितले. कॅनडाचे आरोग्य सेवक इबोला रुग्णांवर उपचार करणार आहेत.