आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लिबियात बंडखोरांना सरकारी नोकरी नको

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

त्रिपोली - लिबियात कर्नल गद्दाफी यांच्या हुकूमशाहीला नेस्तनाबूत करणा-या बंडखोरांना देशाच्या नवीन व्यवस्थेत सहभागी होण्याची इच्छा नाही. त्यामुळेच सुरक्षा दलात सामील होण्यास नागरिकांनी नकार दिला आहे. सुरक्षा दलातील नोक-यांसाठी केवळ शंभर अर्ज आले आहेत.
वास्तविक लिबियाच्या नवीन सरकारने बंडखोरांना सुरक्षा दलात सहभागी होण्याचे आमंत्रण दिले होते. गेल्या चोवीस तासांत केवळ 100 अर्ज आल्याने सरकारची चांगलीच निराशा झाली. लिबियाची सुरक्षा ही एक मोठी समस्या बनली आहे. ही समस्या सोडवण्यासाठी सरकारने ही क्लृप्ती लढवली होती, परंतु त्याला नागरिकांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. एनटीसी सरकारने अगोदरच आंदोलकांना पोलिस किंवा सैन्यात भरती होण्याचे आवाहन केले होते. कारण आंदोलक नागरिक सरकारमध्ये सहभागी झाले नाही तर देशात पुन्हा एकदा गृहयुद्ध होऊ शकते, अशी भीती सरकारला वाटू लागली आहे.
देशातील बंडखोरांची संख्या नेमकी किती आहे, हे सरकारला ठाऊक नाही. कर्नल गद्दाफी यांना सत्तेवरून खाली खेचण्यासाठी हजारो आंदोलक सक्रिय सहभागी झाले होते. त्यामुळे सरकारला मोठी अपेक्षा होती. दुसरीकडे काही लोकांनी अर्ज जरूर केले. परंतु त्याची संख्या केवळ शंभरापर्यंत पोहोचली आहे. ही नोकरी लागल्यानंतर नागरिकास महिना 22 हजार एवढा पगार दिला जाणार आहे. वेतनाची चांगली सुरुवात असतानादेखील नागरिकांनी त्याला समाधानकारक प्रतिसाद दिला नाही.