आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Libya News In Marathi, Indian Citizen, Divya Marathi

लिबियातील अस्थिर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर 216 भारतीय मायदेशी परतले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - लिबियातील अस्थिर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिक मायदेशी परतू लागले असून मंगळवारी 216 नागरिक परतले. मायदेशी परतलेल्या भारतीयांची संख्या आता 2 हजार 750 झाली आहे. हे नागरिक लिबियातील खासगी कंपन्यांमध्ये काम करत होते. देशात मोठ्या प्रमाणात हिंसाचाराला सुरुवात झाल्यानंतर भारतीय परतू लागले आहेत.
देशात एकूण 18 हजार भारतीय असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. अजूनही 1 हजार भारतीय असुरक्षित ठिकाणी अडकून पडल्याचा सरकारचा अंदाज आहे.