आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Libyan Prime Minister Ali Zeidan Kidnapped: Government

अपहरणापूर्वी दहशतवाद्याच्‍या कुटुंबियांना भेटले होते लिबीयाचे पंतप्रधान अली झिदान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

त्रिपोली- लिबीयाचे पंतप्रधान अली झिदान यांचे आज (गुरुवार) पहाटे अपहरण करण्‍यात आले आहे. लिबीयाच्‍या सरकारने शासकीय वेबसाईटवर याबाबत अतिशय थोडक्‍यात माहिती दिली आहे.

सरकारने दिलेल्‍या माहितीनुसार, झिदान यांचे भल्‍या पहाटे काही सशस्‍त्र लोकांनी अपहरण केले. त्‍यानंतर त्‍यांना अज्ञात स्‍थळी नेण्‍यात आले. लिबीयामध्‍ये सध्‍या हंगामी सरकार आहे. झिदान या काळजीवाहू सरकारचे प्रमुख होते. त्‍यांचे अपहरण का करण्‍यात आले, याबाबत माहिती देण्‍यात आलेली नाही.

झिदान यांचे अपहरण लिबीयन बंडखोरांची केल्‍याचा संशय आहे. झिदान यांचे मुक्‍कामी असलेल्‍या हॉटेलमधूनच अपहरण करण्‍यात आले. या घटनेनंतर लिबीयातील कॅबिनेटची आपात्‍कालीन बैठक बोलाविण्‍यात आली आहे. काही जणांनी सांगितले, की भ्रष्‍टाचाराच्‍या आरोपांमुळे झिदान यांना अटक करण्‍यात आली आहे. परंतु, पंतप्रधान कार्यालयाने यास दुजोरा न देता अपहरणाचीच माहिती दिली आहे.

अपहरणापूर्वी झिदान अल कायदाचा दहशतवादी अनस अल लिबीच्‍या कुटुंबियांना भेटले होते. अल लिबी हा अमेरिकेच्‍या मोस्‍ट वॉंटेड दहशतवाद्यांपैकी एक आहे. नेव्‍ही सील्‍स कमांडोंनी गेल्‍या शनिवारी त्‍याला ताब्‍यात घेतले होते. नमाज अदा करुन परतताना त्‍याला पकडण्‍यात आले. अफ्रिकेत 1998 मध्‍ये अमेरिकन दुतावासांवर करण्‍यात आलेल्‍या हल्‍ल्‍यांप्रकरणी तो अमेरिकेला हवा होता. त्‍याच्‍यावर 50 लाख डॉलर्सचे बक्षीसही आहे. अल लिबीला पकडल्‍यावरुन झिदान यांनी अमेरिकेला स्‍पष्‍टीकरणही मागितले होते.