इस्लामाबाद - भारताला सध्या एकीकडून चीन आणि दुसरीकडून पाकिस्तानच्या घुसखोरीचा सामना करावा लागत आहे. त्यातच पाकिस्तानची गुप्तहेर संस्था आयएसआयने त्यांच्या नव्या प्रमुखाच्या नावाची घोषणा केली आहे. लेफ्टनंट जनरल रिझवान अख्तर यांना हे पद देण्यात आले आहे. 1 ऑक्टोबर रोजी जहीर उल-इस्लमाम यांच्याकडून ते पदभार स्विकारणार आहेत. अख्तर हे आर्मी चीफ जनरल राहिल शरीफ याचे निकटवर्तीय मानले जातात. पाकिस्तानात सध्या जे अस्थिरतेचे वातावरण आहे, त्यात अख्तर यांची झालेली नियुक्ती शरीफ यांच्यासाठी फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे. आयएसआय प्रमुखांच्या नियुक्तीशिवाय पाकिस्तान लष्करात इतरही अनेक बदल करण्यात आले आहेत.
कोण आहे रिझवान अख्तर
जनरल रिझवान अख्तर यांनी पाकिस्तानातील क्वेटा येथील कमांड अँड स्टाफ कॉलेजमधून पदवी शिक्षण पूर्ण केले. फ्रंटियर फोर्सशी ते संबंधीत आहेत. पाकिस्तानच्या फाटा आणि इन्फ्रंट्री ब्रिगेडचे नेतृत्व केलेले आहे.
ऑपरेशन कराचीत महत्त्वाची भूमिका
जनरल अख्तर यांनी दहशतवाद विरोधी पथकाचे यशस्वी नेतृत्व केलेले आहे. त्यांच्या याच गुणामुळे त्यांना 2007-10 दरम्यान अशांत दक्षिण वजिरीस्थान भागात पोस्टिंग देण्यात आली होती. त्यांच्या सोबत काम करणार्या एका अधिकार्याने सांगितले, कराची सारख्या शहरात त्यांनी निष्पक्ष आणि राजकारणापलिकडे जाऊन काम केले. दहशतवादा विरोधात काम करण्याचा त्यांना मोठा अनुभव आहे.
कराचीतील दहशतवादी आणि गुन्हेगारी तत्वांविरोधात त्यांनी काही दिवसांपूर्वी एक ऑपरेशन हाती घेतले होते. मात्र, जेव्हा ऑपरेशन शेवटच्या टप्प्यात आले तेव्हा त्याचे नेतृत्व दुसर्या अधिकार्याकडे देण्यात आले होते.
पुढील स्लाइडमध्ये, रिझवान अख्तर यांची काही जूनी छायाचित्रे