आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृत्यूनंतरही आपल्याला माहित असते आजूबाजूला काय घडत होते, वैज्ञानिकांचा दावा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन- मृत्यूनंतर जीवन असते? उत्तर आहे हो. तेही चेतना म्हणजेच कॉन्शसनेससोबत. मृत्यूनंतरही आपल्याला माहित असते, की आजूबाजूला काय घडत होते. वैज्ञानिकांनी ही गुत्थी जवळपास सोडवली आहे. ब्रिटनच्या साऊथ एम्पटन विद्यापिठाच्या शास्त्रज्ञांनी हा शोध लावला आहे.
ब्रिटन, अमेरिका आणि ऑस्ट्रियातील 15 रुग्णालयांमध्ये दाखल असलेल्या 330 लोकांवर संशोधन करुन शास्त्रज्ञांनी हा शोध लावला आहे. या सर्व रुग्णांना हार्ट अटॅक आला होता. त्यांचा काही मिनिटांसाठी मृत्यू झाला होता. त्यांचा जीव वाचवण्यापूर्वी ते क्लिनिकली डेड होते. त्यांच्या हृदयाचे ठोके बंद पडले होते.
परंतु, या रुग्णांना माहित होते, की मृत्यूनंतर त्यांच्या आजूबाजूला काय घडत होते. त्यांची चेतना जागृत होती. संशोधनात सहभागी असलेल्या एका डॉक्टरने यासंदर्भात सांगितले, की हृदयाने काम करणे बंद केल्यानंतर 20-30 सेकंदांनी मेंदु काम करणे थांबवतो. परंतु, संशोधनात मृत्यूनंतरही काही मिनिटे लोकांचा मेंदु सुरू होता, असे समोर आले आहे.
पुढील स्लाईडवर वाचा, क्लिनिकली डेड घोषित केलेल्या रुग्णांचा जीव वाचण्यात आला त्यानंतर त्यांनी शेअर केलेले अनुभव...