आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तराफा तुटला, स्वप्न भंगले; दैव बलवत्तर म्हणून वाचला जीव

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पॅरिस - समुद्री वादळात तराफा तुटूनही फक्त दैव बलवत्तर असल्याचे फ्रान्सच्या एका सागरवीराचा जीव वाचला. अँलेन डिलॉर्ड हा 63 वर्ष वयाचा सागरवीर तराफ्यावरून जगप्रदक्षिणेसाठी निघाला. ऑस्ट्रेलियाजवळ पोहोचत असतानाच तराफ्याकडे घोंघावत येणारे समुद्री वादळ पाहून अंतकाळ जवळ कल्पनेने तो घाबरला. महाकाय लाटांनी त्याच्या तराफ्याचे दोन तुकडे केले, पण अँलनने लाइफ बोटचा आसरा घेतला. तीन दिवस अथांग सागरात अन्न-पाण्याविना समुद्रात तरंगत त्याने मृत्यूशी झुंज दिली. ऑस्ट्रेलियातील तस्मानियापासून सुमारे 926 किमी अंतरावर ओरियन नावाच्या एका जहाजावरील कर्मचार्‍यांचे या नावेकडे लक्ष गेले आणि अँलनचा जीव वाचला. सध्या तो एका रुग्णालयात उपचार घेत आहे.

छायाचित्र - हेलकावे खाणारी लाइफ बोट