आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोनेरी स्वप्न पाहाण्यासाठी जीवाची बाजी लावतात नॉबसिनमधील लहान मुले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नॉबसिन- गनजॉर्गो देशातील मॉगटेडो शहरापासून 10 किलोमिटर अंतरावर नॉबसिन हे गाव आहे. नॉबसिन येथे सोन्याच्या खाणी आहेत. येथे सोने शोधण्यासाठी अक्षरश: जीवाची बाजी लावली जाते. सोने मिळेल या अपेक्षेने लहान मुलांना 30 मीटर खोल खड्ड्यात उतरविले जाते. विशेष म्हणजे खड्ड्‍ात दगड फोडण्यासाठी सुरुंगही लावले जातात. हे काम पूर्णपणे बेकायदा चालते. फोडलेले दगडही लहान मुले वर घेऊन येतात.

विना सुरक्षा सोने शोधण्यासाठी खोल खड्ड्यात उतरणे हे धोकादायक असते. हे सोनेरी स्वप्नसाठी आतापर्यंत शेकडो मुलांच्या जीवावर बेतले आहे.

दरम्यान, नॉबसिन या गावात शेती केली जाते. परंतु, त्या तुलनेत बेरोजगार तरुणांची संख्या जास्त आहे. त्यामुळे बहूतेक लोक सोने शोधण्यासाठी घराबाहेर पडतात. विशेष म्हणजे आपल्या लहान मुलांचीही मदत घेतात.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा, नॉबसिनमध्ये सोन्याच्या खाणीत बेकायदा काम करणार्‍या लहान मुलांची छायाचित्रे...