आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

१० कोटी वर्षांपूर्वी बनली चुनखडीची टेकडी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ब्रिटनमधील पूर्वेकडे असलेल्या ससेक्स शहरात ५३० फुटांची देशातील सर्वात मोठी टेकडी आहे. समुद्रतटावर असल्याने याचे नाव "बीची हॅड' असे झाले. टेकडीच्या एका बाजूला असलेल्या चढावर मैदान आणि दुस-या बाजूला समुद्र आहे. उंचावर पोहोचल्यानंतर लोक तेथील डुंगनेस किना-यावरील पश्चिमेस असलेल्या सेल्सी किना-यावरील दृश्ये पाहत होती.
चुनखडीच्या टेकडीबाबत असे म्हटले जाते की, ती १० कोटी वर्षांपूर्वी बनलेली आहे. तेव्हा या शिळेचा बराचसा भाग पाण्यात बुडालेला होता. हजारो वर्षे उलटल्यानंतर चुनखडीच्या टेकडीचे वेगवेगळे हिस्से झाले. या टेकडीची उंची खूप असल्याने येथे सतत पोलिसांची गस्त चालू असते. एखादी अपघाताची घटना घडल्यास वेळेवर मदत पोहोचावी, असा यामागचा उद्देश आहे.