आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिकारीवरून सिंहीण आणि मगरीमध्‍ये चांगलीच जुंपली, बघा PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

केनिया - निसर्गाने सर्व सजिवांसाठी एक अन्‍नसाखळी तयार आहे. प्रत्‍येक जीव दुस-या जीवावर अवलंबून आहे. परंतु पोटापुढे/ भूकेपुढे सर्व नियम थिटे पडतात. चक्‍क सिंहीणीने पाणघोडयाची शिकार केली. परंतु शिकार घेऊन जाताना तिला मगरीशी संघर्ष करावा लागला. ही घटना केनियातील मसाई मारा भागामध्‍ये नदीतीरी घडली.

वन्‍यप्राण्‍यामधील या लढतीला अमेरिकेतील आयटी मॅनेजर रिचर्ड च्‍यू याने कॅमे-यामध्‍ये कैद केले आहे. दोन्‍ही प्रजाती वेगवेगळया आहेत. मात्र दोन्‍हींतील संघर्ष पराकोटीचा होता. जणू काही दोन सिंहामध्‍ये लढाई सुरु होती.

रिचर्ड यांनी दिलेल्‍या माहितीनुसार, सिंहीण भूकेने व्‍याकूळ होती. तिने काही न पाहता सरळ पाणघोड्यावर हल्‍ला चढविला. त्‍याची शिकार केली. मात्र शिकार पाण्‍यातून बाहेर ओढताना तिला मगरीचा सामना करावा लागला. मगरींची सहाय्यता करण्‍यासाठी मगरींचा समुह त्‍या ठिकाणी आला. मात्र सिंहीणीने त्‍यांचा जोरदार सामना केला. सिंहीणीने त्‍यांच्‍यावर जोरदार झडपा घातल्‍या. कोणीही मागे हटायला तयार नव्‍हते. विजय मगरींचाच झाला असावा असा कयास रिचर्ड यांचा आहे.

पुढील स्‍लाइडवर पाहा, सिंहीण आणि मगरींमधील झटापटीची छायाचित्रे...