आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चरबीच्या पेशीची कहाणी ऐका तिच्याच शब्दात

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


जवळपास 10 वाजले आहेत. मी यकृताजवळ आहे. नुकतेच एनर्जी ड्रिंक मिळाले आहे. मस्त, गोड आहे. खरंच मला खूप आवडते. पचनक्रियेतून जाताना चोरून यकृतापर्यंत येते. यकृत त्याचे चरबीत रूपांतर करून माझ्यापर्यंत आणते. व्हॉट अ बोनांझा? मला मोठी मेजवानी मिळाली. फक्त मलाच नाही तर माझ्या इतर मैत्रिणींनाही (म्हणजेच चरबीच्या पेशींना). वर्षानुवर्षे मांसपेशींचे राज्य होते. आता आमची वेळ आहे. त्यासाठी तुम्हाला माझ्यावर विश्वास ठेवण्याची गरज नाही. तुमच्या आजूबाजूच्या रस्त्यावर पाहा. 35 टक्के प्रौढ लोक स्थूलपणाने ग्रस्त आहेत. एवढेच नाही तर हृदयविकार, मधुमेह आणि इतर अनेक आजारांनी ग्रस्त. पण मी मजेत आहे. 11 वाजले आहेत. शरीराला भूक लागली आहे. नुकताच केक मिळाला आहे. त्यात भरपूर कॅलरीज आहेत, पण समाधान होत नाही. विशेष म्हणजे शरीराचे पोट भरल्याची जाणीव करून देणारे लॅप्टिन नावाचे हार्मोन सिग्नल मेंदूला पाठवण्याचे काम माझे आहे. सध्या मध्यपूर्वेकडील तेलविहिरींप्रमाणे मी लॅप्टिनचा प्रचंड उपसा करत आहे. हे लॅप्टिन रक्तप्रवाहात विनाकारण फिरत राहते. पोट भरलेले आहे, असा मी पाठवलेला संदेश स्वीकारणे जणू मेंदूने बंदच केले आहे. जेवण केल्यावरही तो भुकेलाच असतो.

आयुष्य साखरेप्रमाणे गोड आहे. पण नेहमी असे नसते. मला आठवते, 40 वर्षांपूर्वी स्थूल मित्रांसोबत असताना मला थोड्याशा चरबीसाठी दिवसभर वाट पाहावी लागत होती. पण ते थोडे पोषणही काम करत होते. आम्ही चरबीच्या पेशी थोड्या प्रसरण पावत होतो आणि पुन्हा तत्काळ आकुंचन पावत होतो. शरीर तेवढे कष्ट करत होते. पण मी तुम्हाला सांगते, आम्ही कुठेच जाणार नाहीत. खरं तर चरबीच्या पेशी कधी लोप पावत नाहीत. त्या अमर आहेत. सामान्य माणसाच्या शरीरात प्रौढ झाल्यानंतरच चरबीच्या पेशींची वाढ होते. पण तुम्ही स्थूल असाल तर तुमच्या चरबीच्या पेशी फुलतात. त्या एवढ्या फुलतात की, त्यापासून नव्या पेशी तयार होतात. माझ्या शेजारी एखादी पेशी आल्यास ती जास्तीत जास्त जागा व्यापते. मी ऐकले आहे की, शरीरात 40 अब्जांपेक्षा जास्त पेशी असतात. पण मी सांगते की, माझ्यासारख्या 80 अब्ज पेशी इथं आहेत. मी सुदैवी आहे. कारण, शरीर कॉलेजात जाऊ लागते तेव्हा त्याला सोडा पिण्याची सवय लागते. प्रत्येक लंचनंतर सोडा. प्रत्येक वेळी मी यकृताकडून थोडे थेंब घेऊन त्याचा साठा करत गेले. दुपारी स्फूर्तीसाठी कॅफीन घेतले जाते. अहाहा! नंतर नोकरी लागली. म्हणजे रोज एक सोडा कॅन. संध्याकाळी जंक फूड पार्टी. असे आहे माझे सुंदर आयुष्य.

:rd.com