छायाचित्र : रामचंद्र गुहा
वॉशिंग्टन - न्यूयॉर्क टाइम्स बुक रिव्ह्यू २०१४ च्या सर्वोत्कृष्ट १०० पुस्तकांच्या यादीत ६ भारतवंशीय लेखकांचा समावेश आहे. अमेरिकेत स्थायिक सर्जन व लेखक अतुल गावंडे यांचे ‘बिइंग मॉर्टल : मेडिसिन अँड व्हॉट मॅटर्स इन द एंड ’, तसेच इतिहासकार रामचंद्र गुहा यांचे ‘गांधी बिफोर इंडिया’ ही पुस्तके येथील माध्यमांत अधिक वाखाणली गेली. अखिल शर्मा, भारतीय- अमेरिकन लेखक विक्रम चंद्रा, लेखक-पत्रकार आनंद गोपाल, स्तंभलेखक - लेखक आनंद गिरीधरदास यांच्या पुस्तकांचा या यादीत समावेश आहे.