आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जपानमध्ये जिवंत खाल्ला जातो बेडूक, बघा व्हायरल झालेला VIDEO

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो- यू-ट्यूब स्क्रीनशॉट: 'बुलफ्रॉग सैशिमी' या डिशचा आस्वाद घेताना महिला.)
जपानमधील असादाची नावाच्या एका रेस्टरॉंत जिवंत बेडूक खाण्यासाठी दिला जातो. या डिशचे नाव 'बुलफ्रॉग सैशिमी' असून याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. परंतु, यासोबतच असादाची रेस्तरॉंवर घणाघाती टिका केली जात आहे. बेडूक जिवंत असताना डिशमध्ये सजवून वाढणे योग्य नसल्याचे मत काहींनी व्यक्त केले आहे. या डिशच्या व्हिडिओला आतापर्यंत तब्बल 10 लाख लोकांनी बघितले आहे.
ब्रिटनची वेबसाईट डेली मेलने या डिशला आतापर्यंतची सर्वांत घाणेरडी डिश असे म्हटले आहे. या डिशला गार्निश करण्यासाठी सोया सॉस, लिंबूचे काप आणि सलादचा वापर केला जातो.
पुढील स्लाईडवर बघा, या डर्टी डिशचा मनाला विचलित करणारा व्हिडिओ... आणि फोटो...