आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनसमोर निरंतर वाढत्या कर्जाचे गंभीर संकट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जागतिक आर्थिक मंदीनंतर एका महत्त्वाच्या आर्थिक घटनाक्रमावर लोकांचे लक्ष गेले नाही. काही आठवड्यांपूर्वी चीनमध्ये पहिल्यांदा एका कॉर्पोरेट बाँडचे पैसे देता आले नाहीत. सौरऊर्जा बनवणारी फर्म शांघाय चाओरीसोबत असे झाले आहे. ही एक लहान खासगी कंपनी आहे. तरीही डिफॉल्टची ही घटना जगाच्या द्वितीय क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेच्या अवस्थेचे संकेत देतात. चीन या क्षणी अशा कर्ज संकटाशी तोंड देत आहे, जसे लीमेन ब्रदर्सच्या पाडावानंतर पाहण्यात आले नाही. तसे लीमेनच्या तुलनेत चाओरीचा डिफॉल्ट किरकोळ आहे. ती 16 कोटी 30 लाख डॉलरच्या बाँडचे पैसे फेडू शकली नाही. लीमेनने गाशा गुंडाळला तेव्हा, तिला 613 अब्ज देणे होते.

चाओरीला डिफॉल्टर होण्याची परवानगी देऊन चीनने संकेत दिले की, त्या समस्येकडे त्याचे दुर्लक्ष होत नाहीये. चीनमध्ये सरकार सरकारी बँकांना कर्ज द्यायला सांगते, तेव्हा कर्जदारांची स्थिती न जाणून घेताच विचारले जाते किती कर्ज पाहिजे आहे तुम्हाला? चीनच्या मोठ्या बँकांनी 2012 च्या तुलनेत गेल्या वर्षी दुप्पट कर्ज बुडीत खात्यात टाकून दिले आहे. मोर्गन स्टॅनले इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंटमध्ये नवोदित बाजारांचे प्रमुख रुचिर शर्मा म्हणतात, इतर कोणत्याही देशांच्या तुलनेत चीन वेगाने कर्जवाटप करत आहे. यापैकी बहुतांश कर्ज उत्पादक खासगी क्षेत्रांऐवजी सार्वजनिक संस्थानांना दिले जात आहे. चीनमध्ये पाच वर्षांपूर्वी एका डॉलरची आर्थिक प्रगती प्राप्त करण्यासाठी एक डॉलर कर्जाची गरज पडत होती. आता एक डॉलर प्रगतीवर चार डॉलर लागतात.

चीनचे आर्थिक संकट अमेरिका किंवा इतर देशांसारखे नाही. चिनी कर्ज पूर्णत: चीनचेच आहे. त्याचा बहुतांश वाटा सार्वजनिक क्षेत्र आणि सरकारला दिले गेले आहे. सरकारकडे चाळीस अब्ज डॉलरची गंगाजळी आहे. ती कंपन्यांना कर्जाच्या संकटातून बाहेर काढू शकते. अर्थशास्त्री अँड्र्यू पोल्क सांगतात, गेल्या दोन वर्षांत वीस वेळा संकटग्रस्त फर्म्सना आधार दिला आहे. परंतु यातून पुढे जाऊन स्थिती अवघड बनेल. आर्थिक विकास दर अडखळेल. या क्षणी विकास दर पाच टक्के आहे. काही वर्षांपूर्वी विकास दर दोनांकी होता. बीजिंगमध्ये आता विकास दर सात टक्के राखण्यासाठी अधिक मदत देण्याचा विचार सुरू आहे. बेरोजगारी धोकेदायक पातळीवर पोहोचण्यापूर्वी अशा उपाययोजना करण्यात येत आहेत.

चीनमध्ये सकल देशांतर्गत उत्पन्न (जीडीपी) जवळपास दुप्पट झाले आहे. परंतु, या परिस्थितीत सुधारणा होण्यासाठी काही ठोस पावले तर उचलावी लागतीलच. कर्जाचे संकट सोडवता आले नाही, तर त्यासाठी आर्थिक विकासाच्या पुढील टप्प्यात अपेक्षित पातळी गाठणे चीनला बरेच अवघड जाण्याची शक्यता आहे.