आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ना डिझेलची गरज, ना पेट्रोलची! हवेवर चालते लेगो कार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेलबर्न - तरुण पिढीच्या अफलातून कल्पनाशक्तीतून अशक्य गोष्टही सत्यात उतरू शकते, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. इंटरनेटवर परस्परांशी भन्नाट कल्पना शेअर करणार्‍या रोमन आणि ऑस्ट्रेलियन तरुणांनी एकत्र येऊन हवेवर चालणारी कार तयार करून दाखवली आहे. विशेष म्हणजे ही कार पाच लाख लेगो ब्लॉक्स (मुलांच्या खेळण्यातील ठोकळे) वापरून तयार करण्यात आली आहे. अनेक तरुणांच्या प्रयत्नांतून सिद्ध झालेल्या या प्रयोगाची सुरुवात एका ट्विटने झाली. हवेवर चालणारी कार तयार करण्याची अफलातून कल्पना एका रोमन तरुणाने ट्विटरवरून मांडली. फक्त यासाठी अवाढव्य खर्च येणार असल्यामुळे तो एकटा या कारच्या निर्मितीसाठी पैसा लावू शकणार नव्हता. या प्रयोगात आर्थिक मदत करण्याचे आवाहन त्याने केले होते. या कारची चाके सोडल्यास इतर सर्व भाग लेगो ब्रिक्सने तयार केलेले आहेत. हवेवर चालणारी चार इंजिने आणि 256 पिस्टनद्वारे कारसाठी ऊर्जा पुरवण्यात येते.