आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
लंडन - एखाद्या जेम्स बाँड चित्रपटात शोभावे अशा नॅनो ड्रोनची निर्मिती करण्यात ब्रिटनला यश आले आहे. अलीकडेच अमेरिकेकडून त्याचे यशस्वी परीक्षण करण्यात आले. हेरगिरी करण्यासाठी वापरण्यात येणाºया या विमानाचे वजन केवळ 198 ग्रॅम एवढे आहे. त्याचा वापर तालिबानविरुद्ध करण्यात येईल.
तालिबानविरुद्ध लढण्यासाठी या मानवरहित विमानाचा प्रभावीपणे वापर करता येऊ शकतो. या हेरगिरी करणाºया विमानाला एसक्यू-4 रिकॉन असे नाव देण्यात आले आहे. अशा प्रकारचे जगातील सर्वात लहान मानवरहित विमान ठरले आहे. अफगाणिस्तानात जवानांना वाचवण्याचे काम आम्ही याद्वारे करणार आहोत. या देशात तालिबान्यांकडून करण्यात येणाºया हल्ल्यात जवानांचे ठार होण्याचे प्रमाण अधिक आहे.
‘यू ओन्ली लिव्ह ट्वाइस’ या चित्रपटात जेम्स बाँडने अशा प्रकारचे छोटे विमान वापरले होते. कार्डिफ येथील बीसीबी इंटरनॅशनल विद्यापीठाच्या स्वायत्त प्रयोगशाळेत एसक्यू -4 रिकॉनची निर्मिती करण्यात आली. त्यानंतर अमेरिकेकडून त्याची चाचणी घेण्यात आली. आधुनिक युद्धाच्या दृष्टीने हे शस्त्र महत्त्वाचे ठरणार आहे. कारण याचा वापर करून जीवित हानी टाळता येणार आहे, असे बीसीबी इंटरनॅशनलचे व्यवस्थापकीय संचालक अँड्र्यू हॉवेल यांनी सांगितले.
काय आहे क्षमता ?
हे विमान एखाद्या पक्ष्यासारखे दिसते. वजनाने सर्वात हलके. वजन केवळ 198 किलोग्रॅम आहे. या नॅनोड्रोनमध्ये दोन कॅमेरे लावण्यात आले आहेत. त्यामुळे शत्रूच्या हालचालींवर लक्ष ठेवणे सहज शक्य होणार आहे. डोंगराळ भागात दहशतवाद्यांच्या कारवायांना प्रत्यक्ष पाहणे शक्य होईल.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.