आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालंडन - साहेबांचा देश असलेल्या ब्रिटनचे ‘आजोबा’ नुकतेच सापडले आहेत. जनुकीय पातळीवर एक प्राध्यापक ब्रिटनच्या ख-याखु-या पूर्वजांचा थेट वंशज असल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे.
इयान किनाइर्ड असे या प्राध्यापकाचे नाव असून त्यांचे वय 72 वर्षे आहे. आदिमानवाच्या कालखंडात 1 लाख 90 हजार वर्षांपूर्वी पृथ्वीवर वावरणा-या पहिल्या महिलेशी त्यांचे जनुक जुळल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. त्यासाठी इयान यांची जनुकीय चाचणी घेण्यात आली होती.
इयान यांच्या शरीरात एक आनुवंशिक खूण आढळून आली. ती खूण त्यांच्या आईकडून त्यांना मिळालेली आहे. अशा प्रकारचा घटक याअगोदर कधीही पश्चिम युरोपमध्ये दिसून आला नाही. जनुकीय परिभाषेत इयान हे शुद्ध असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळेच ते त्या महिलेचे नातू व अख्ख्या ब्रिटनचे आजोबा असू शकतात, असे त्यांना वाटते.
इयान हे उत्तर स्कॉटलंडमध्ये राहतात. त्यांच्या डीएनए चाचणीचा निष्कर्ष पाहून शास्त्रज्ञही अवाक् राहिले. त्यांच्यातील महिलाविषयक जनुकीय संबंध 30 हजार वर्षांपूर्वीचा आहे. याच काळात आनुवंशिक परिवर्तन झाले होते. जास्तीत जास्त पुरुषांमध्ये आनुवंशिक परिवर्तनाची 200 आवर्तने झाल्यानंतर जनुकात बदल झाल्याचे दिसून येते. इयान यांच्या जनुकात नॉर्वे वंशाच्या व्यक्तींमध्ये सापडणारे मार्कर दिसून आले आहेत. हे मार्कर सुमारे 3 हजार 500 वर्षे एवढे जुने आहेत. हे मार्कर ब्रिटनचे प्रारंभिक नागरिक, प्राचीन आयरिश, शिकारी समुदाय, गुंफेतील रंगोटीचे काम करणारे समुदाय यांच्यात सापडले आहेत. त्यांच्यातील बदल आश्चर्यकारक आहे. ते जणू ईडन गार्डनमध्ये आहेत असे त्यांचे वर्णन करता येऊ शकेल, असे अॅलिस्टर मॉफट यांनी म्हटले आहे. ते सेंट अँड्र्यूज विद्यापीठातील ब्रिटन्स डीएनए या जनुकीय प्रकल्पाचे संस्थापकांपैकी आहेत. ब्रिटन्स डीएनए या प्रकल्पातून देशाच्या पूर्वजांचा अभ्यास केला जात आहे. इव्ह ही स्त्री व अॅडम हा पुरुष यांच्यापासूनच ब्रिटनचा इतिहास घडला. हे दोघेच ब्रिटनचे आदी स्त्री-पुरुष असावेत, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.
अॅडम मध्य आफ्रिकेत राहत होता. इव्ह व अॅडमचे जनुक आपले अस्तित्व टिकवू शकले. इतर महिला, पुरुषांचे डीएनए कालौघात तग धरू शकले नाहीत, असे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. या प्रकल्पातून ब्रिटनच्या वंशवृक्षाचा शोध घेण्याचे उद्दिष्ट आहे. यापूर्वीच्या एका शोधात अभिनेता टॉम काँटी हा आदिपुरुषांशी
संबंधित वंशज आहे, असे म्हटले होते. एवढेच नाही तर तो नेपोलियन बोनापार्टचा वंशज असल्याचा दावाही करण्यात आला होता.
गो-यांची माता कृष्णवर्णीय
इयान यांच्या डीएनएची चाचणी ब्रिटनसाठी अनेक अर्थांनी महत्त्वाची ठरते. कारण इंग्रजांना आपल्या ज्या गौरवर्णाचा गर्व वाटतो त्याला जन्म देणारी माता कृष्णवर्णीय होती, असे शास्त्रज्ञ मॉफट यांनी सांगितले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.