आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • London Olympics: Iran's Reihanpour Wins Greco roman 55kg

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

LONDON OLYMPIC : कुस्तीतील पहिले सुवर्ण इराणला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - ऑलिम्पिकमध्ये कुस्तीचे पहिले सुवर्ण इराणच्या नावे राहिले. हमीद मोहंमद सोरयानने पुरुषांच्या 55 किलो गटातील ग्रीको रोमन प्रकारात सुवर्ण कामगिरी केली. 26 वर्षीय हमीदने रविवारी रात्री अझरबैजानच्या रोवशान बायरामोवला 3-0 अशा गुण फरकाने पराभूत केले.
बायरामोवने बीजिंग ऑलिम्पिकमध्ये देखील रौप्यपदक मिळवले होते. रशियाच्या मिंगियान सेमेनोव आणि हंगेरीच्या पीटर मोदोसने कांस्यपदकावर नाव कोरले. कांस्यपदकाच्या लढतीत सेमेनोवने दक्षिण आफ्रिकेच्या जियूजिन चोई आणि मोदोसने डेन्मार्कच्या हाकन डेरिक निबोलॉमला पराभूत केले. रशियाच्या रोमान ब्लासोवने 74 किलो वजन गटात ग्रीको रोमन प्रकारात सुवर्ण पटकावले. त्याने अंतिम सामन्यात आर्मेनियाच्या आर्सेन जुल्फालकियानला 3-0 अशा फरकाने नमवले. लिथुआनियाच्या एलेक्जांद्र कजाकेविच आणि अजरबैजानच्या एमिन अहमदोवने कांस्यपदक मिळवले. कजाकेविचने डेन्मार्कच्या मार्क ओवरगार्द आणि अहमदोवने बेलारूसच्या एलेक्जांद्र किकिनोऊचा पराभव केला.