आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • London Oregon University Research Wine Is Good For Bons

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

थोडी,थोडी ‘वाइन’ पिया करो

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - दररोज एक-दोन ग्लास वाइन प्यायल्याने हाडांची ठिसूळ होण्याची गती कमी होते. शरीरात काही प्रमाणात अल्कोहोल जायलाच हवे, अन्यथा वृद्धापकाळात हाडे ठिसूळ होऊन ‘ऑस्टिओपोरोसिस’ व्याधी महिलांच्या मागे लागण्याची शक्यता असते, असा दावा ओरेगॉन विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी केला आहे.
रजोनिवृत्तीनंतर दररोज एक अथवा दोन ग्लास वाइन घेतल्यास हाडांची मजबुती राखण्यास महिलांना मदत होते. मात्र, शरीराला अल्कोहोल पुरेशा प्रमाणात मिळाले नाही, तर हाडे बारीक व ठिसूळ होत जातात असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. संशोधकांच्या चमूने रजोनिवृत्ती झालेल्या 40 महिलांची चाचणी घेतली. या महिलांचे वय 56 होते. त्यापैकी दररोज 19 ग्रॅम अल्कोहोल सेवन करणा-या (वाइनचे दोन छोटे ग्लास) महिलांमध्ये जुनी हाडे ठिसूळ होण्याचे प्रमाण कमी असल्याचे निदर्शनास आले.