आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युवराज्ञीचा पाय अडकला लंडनच्या ड्रेनेजमध्ये

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - अत्याधुनिक लंडन शहराची ख्याती काय वर्णावी. पण ब्रिटिश युवराज्ञीला रविवारी विचित्र अनुभव आला. सेंट पॅट्रीक डे संचलनावेळी आयरिश गार्डला मानाची व प्रतिष्ठेची पळसाची पाने दिल्यानंतर गडद हिरव्या रंगाच्या पेहरावात आलेल्या युवराज्ञी केटच्या बुटाचे टोक ड्रेनेजमध्ये अडकले आणि मॅडम अक्षरश: तोंडघशी पडता पडता वाचल्या. अखेर पती राजकुमार विल्समचा हात धरुन मॅडम खाली वाकल्या व त्यांनी पाय बाहेर काढला.