आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अ‍ॅप शोधून देणार हरवलेली किल्ली!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - एखादी वस्तू हरवल्यानंतर व्यक्ती हैराण होऊन जातो. परंतु अशी वस्तू काही सेकंदात मिळाली तर ? अर्थातच व्यक्ती आनंदित होईल. हेच काम तंत्रज्ञानाद्वारे शक्य होणार आहे.

जर्मनीतील उल्म विद्यापीठातील संशोधकांनी हे तंत्रज्ञान विकसित केले आहे. गाडीची किल्ली असेल किंवा वॉलेट कोणत्या ड्रॉवरमध्ये विसरले आहे, याचे उत्तर देणारे हे तंत्रज्ञान दैनंदिन व्यवहारात खूप उपयोगी ठरणार आहे. ‘फाइंड माय स्टफ ’ असे या गॅझेटला नाव आहे. त्याचा वापर स्मार्टफोन किंवा संगणकाद्वारे करता येईल. गुगलसारखे पेज किंवा अ‍ॅपवर त्या वस्तूचे नाव टाइप करताच तिचे ठिकाण दाखवण्याची किमया यातून साध्य होणार आहे.