वॉशिंग्टन - पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत असून त्यांच्या अमेरिका दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर स्वागत कार्यक्रमाला हजेरी लावण्यासाठी लॉटरी पद्धत वापरण्यात येणार आहे. २८ सप्टेंबर रोजी मोदी न्यूयॉर्कमधील मेडिसन स्क्वेअर येथील जाहीर स्वागत समारंभाला उपस्थति राहणार आहेत.
अमेरिकेमधील भारतीय वंशाच्या नागरिकांच्या अनेक संस्थांच्या एकत्रति समन्वयामधून स्थापन करण्यात आलेली इंडियन-अमेरिकन कम्युनिटी फाउंडेशनने हा कार्यक्रम आयोजति केला आहे. कार्यक्रमास उपस्थति राहण्यासंदर्भात संस्थेकडे सोमवारी रात्रीपर्यंत हजारो अर्ज आले होते. ऑनलाइनने हे अर्ज आले आहेत. यांमधील काही अर्ज हे अगदी अलास्का, हवाई यांसारख्या अमेरिकेचे दुसरे टोक असलेल्या प्रांतांमधूनही आले आहेत. या कार्यक्रमाच्या तिकिटांसाठी लॉटरी पद्धत वापरण्यात येईल, असे संस्थेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. शिखर संघटनेच्या सदस्य संघटनेतील कार्यकर्त्यांसाठी सोमवार ही अर्जाची शेवटची तारीख होती, परंतु सामान्य प्रवेशासाठी ७ सप्टेंबर ही शेवटची तारीख आहे.
नोंदणी केलेल्यांना मिळणार संधी
लॉटरी पद्धतीने नोंदणी केलेल्या नागरिकांना मोदींच्या उपस्थितीत होणाऱ्या समारंभाला हजेरी लावण्याची संधी मिळणार आहे. कार्यक्रमाला मिळालेला प्रतिसादामुळे आम्हाला विशेषचकति करणारा वाटत नाही. कारण मेडिसन स्क्वेअरची आसन क्षमता अधकि असती तर त्यांना ऐकण्यासाठी ६० ते ७० हजार एवढीही संख्या जमणे कठीण नव्हते, असे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले.