आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालंडन- जर कमी व्होल्टेजचे स्विच नसते तर अमेरिकेचीदेखील हिरोशिमासारखी स्थिती होण्यास वेळ लागला नसता; परंतु सुदैवाने 1961 मध्ये हायड्रोजन बॉम्बचा उत्तर कॅरोलिनाजवळ स्फोट होता होता वाचला. हा बॉम्ब अमेरिकेने हिरोशिमावर टाकलेल्या बॉम्बच्या 200 पट एवढा शक्तिशाली होता. याचा गौप्यस्फोट पहिल्यांदाच ब्रिटनच्या गार्डियन वृत्तपत्रातून करण्यात आला आहे.
पत्रकार एरिक श्लोसर यांनी माहिती कायद्याच्या माध्यमातून याबाबतचा तपशील मिळवला. 23 जानेवारी 1961 मध्ये बी-52 या बॉम्बवर्षाव करणार्या विमानाचे हवेतच तुकडे झाले. त्यानंतर मार्क 39 चे दोन हायड्रोजन बॉम्ब गोल्ड्स बरो भागात पडणार होते. प्रत्येक बॉम्बमध्ये सुमारे 40 लाख टन टीएनटी स्फोटके भरलेली होती. दोन्हींपैकी एका बॉम्बचे पॅराशूट फाटले होते आणि बॉम्ब टाकणारी यंत्रणा सक्रिय झाली होती; परंतु एका कमी व्होल्टेजच्या स्विचमुळे महाप्रलयापासून महासत्ता वाचू शकली होती.
कशी वाचली महासत्ता? वाचा पुढील स्लाईड्समध्ये...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.