जर तुम्हाला बॉलीवूड आणि हॉलिवूडच्या सेलिब्रिटीप्रमाणे आपल्या सुट्या संस्मरणीय करायच्या असतील तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे. ती ही परवडेल अशी. थायलंडच्या फुकेटजवळ असलेल्या इनियाला बीच हाऊस तुम्हाला अशी संधी देत आहे. इनियालामध्ये अनेक हॉलिवूड सिनेतारक येऊन गेली आहे. रेस्तरॉंचे मालक मार्क विंगार्ड यांच्यानुसार, 2002 मध्ये बाली बॉम्ब स्फोटाचे शिकार झालेल्या लोकांच्या मदतीकरिता परवडेल अशी रेस्तरॉंचे दर ठरवण्यात आली आहे. ऑगस्टपर्यंत येथे थांबणा-यांसाठी 70 टक्के सूट दिली जाईल, असे विंगार्ड यांनी सांगितले. यातून जमा होणारा पैसा इन्सपीरिसिया फौंडेशनला दिला जाणार आहे. फौंडेशन बाली बॉम्बस्फोटाचे बळी ठरलेल्या लोकांना मदत दिली जाणार आहे. सूट दिल्याने रेस्तरॉंचे भाडे 2 लाख 39 हजार 698 रूपयापासून 4 लाख 67 हजार 208 रूपयांपर्यंत आहे.
अप्रतिम आहे रेस्तरॉं
बहुतेक सेलिब्रिटींना अशा प्रकारची रेस्तरॉं आवडत असतात. येथे सुविधांबरोबरच सुंदर अशी दृश्यही पाहावयास मिळतात. अमेरिकन टीव्ही स्टार किम कार्दशियन या रेस्तरॉंमध्ये येऊन गेली आहे. रेस्तरॉंची डिझाइन ग्रॅहम लॅम्बने यांनी केली आहे. येथे एकापेक्षा एक सर्रास अशी फर्निचर आणि अंतर्गत रचना विलोभनीय आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा छायाचित्रे....