आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेतील सर्वात तरूण अब्‍जाधीश लिन्सी टोरेस

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


कॅलिफोर्नियातील बाल्डविन पार्कमधील ‘इन अँड आउट’ फूड चेनच्या अध्यक्षा 30 वर्षीय लिन्सी टोरेस या जगातील सर्वात तरुण अब्जाधीश महिला आता उद्योगपतींच्या श्रेणीत आल्या आहेत. त्यांच्या रेस्टॉरंटमधील प्रत्येक कर्मचारी ग्राहकांना हसून विचारतात की,‘तुम्हाला हॅमबर्गर आवडले का?’ अशा प्रकारच्या सेवांमुळे इन अँड आउटचा मोठा चाहता वर्ग तयार झाला आहे. कोणत्याही कॉलेजची डिग्री नसली तरी लिन्सी यांनी फॉर्मल मॅनेजमेंटचे प्रशिक्षण घेतले आहे.

अ‍ॅपलचे एखादे नवे उत्पादन लाँच होते, त्याचप्रमाणे इन अँड आउटच्या नव्या स्टोअरची सुरुवात होते. लोक तासन्तास आधीपासून स्टोअरच्या बाहेर उभे राहून आपला नंबर येण्याची वाट पाहतात. 1948 मध्ये लिन्सीच्याआजोबांनी बाल्डविन पार्क येथे एका रेस्टॉरंटपासून या उद्योगाची सुरुवात केली, तो आज 53 अब्ज रुपयांपेक्षाही जास्त विस्तारला आहे. या फूड चेनचे अमेरिकेतील पाच राज्यांत 280 पेक्षा जास्त युनिट्स आहेत. कुटुंबातील सदस्यांच्या एकानंतर एक होणा-या मृत्यूमुळे लिन्सींवर व्यवसायाची जबाबदारी आली आहे.1976 मध्ये हेनरी म्हणजेच आजोबांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचा दुसरा मुलगा रिच याच्यावर कंपनीची जबाबदारी आली. त्याने फूड चेनचे युनिट 18 वरून 93 पर्यंत वाढवले. 1993 मध्ये विमान अपघातात रिच मरण पावला. त्यानंतर त्याच्या मुलाने हे युनिट्स 140 पर्यंत विस्तारले. 1999 मध्ये त्याचा मृत्यू झाला. लिन्सीची आजी अ‍ॅशर यांनी 2006 मध्ये 86 व्या वर्षी व्यवसाय हाती घेतला. सध्या लिन्सी एका ट्रस्टच्या माध्यमातून कंपनीचा व्यवसाय सांभाळत आहेत. 35 वर्षांच्या झाल्यावर त्या कंपनीचा व्यवसाय पूर्णपणे हातात घेऊ शकतील. रेस्टॉरंट इंडस्ट्रीमध्ये काम करणारे काही जणत्यांना मार्गदर्शन करतात.

bloomberg.com