आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गीतकार गुलझार यांना पाकिस्तानातून माघारी धाडले?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद- प्रसिद्ध गीतकार गुलझार हे आपला पाकिस्तानचा दौरा अर्ध्यावर सोडून आले आहेत. ते अचानक अमृतसरहून मुंबईच्या फ्लाईटने परतले. गुलझार कराची येथील लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये भाग घेण्यासाठी दोन दिवसापूर्वी खासगी दौ-यावर गेले होते. गुलझार यांनी अचनाकपणे पाकिस्तान सोडून परतण्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

गुलझार यांना पाकिस्तान सरकारने भारतात परतण्यास सांगितले? का अफझल गुरूला फाशीवर चढवल्याने भारतीय दूतावासाने त्यांना भारतात परतण्याचा सल्ला दिला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अफझलला फाशी दिल्यामुळे गुलझार यांना विरोध होण्याची शक्यता होती.

दरम्यान, इस्लामाबादमधील भारतीय दूतावासाने याबाबत कानावर हात ठेवले असून, याबाबत आमच्याकडे काहीही माहिती नाही. तसेच आम्ही गुलझार यांना भारतात परत जाण्याचा सल्ला दिला नसल्याचे स्पष्ट केले. दूतावासातील माहिती सचिव जनार्धन सिंग यांनी सांगितले की, गुलझार साहेबांची पाकिस्तान दौरा खासगी होता. दूतावासाकडे त्यांच्या दौ-याची माहिती नाही. आम्ही त्यांच्या संपर्कात नव्हतो तसेच तेही आमच्या संपर्कात नाहीत. त्यामुळे त्याचा पाकिस्तान दौरा खासगी असून, आम्ही काहीही सांगू शकत नाही.

गुलझार मंगळवारी लाहौरमध्ये पोहचले होते. तेथे त्यांच्या "ढेड इश्किया" या चित्रपटातील कव्वालीचे रेकॉर्डिंग चे कामही होते. या कव्वालीत गायक मेहर अली आणि शेर अली गाणार होते. गुलझार आपल्या कालरा मूळगावीही गेले होते. हे गाव लाहौरपासून सुमारे 250 किलोमीटर दूर आहे.

83 वर्षांच्या गुलझार यांच्यासोबत दिग्दर्शक विशाल भारद्वाज, त्यांची पत्नी रेखा, पाकिस्तानमधील चित्रपट दिग्दर्शक शहजाद रफीक आणि चित्रपट निर्माता अयूब कंवर आदी पाक दौ-यात होते. याचबरोबर गुलझार यांचा लाहौरमधील साहित्यिकांसोबत भेटीचा कार्यक्रम होता. कराचीत येण्यापूर्वी ते कवी अमजद इस्लाम अमजद यांनाही भेटणार होते. मात्र, अचापणपणे गुलझार यांनी मुंबईला परत येणे पसंत केले. मात्र यामागचे नेमके कारण कळाले नाही.