आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Machavelly's 500 Years Old Arrest Warrent Found In Britain

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ब्रिटनमध्‍ये सापडले मॅकियाव्हेलीचे 500 वर्षे जुने अटक वॉरंट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मँचेस्टर विद्यापीठातील प्राध्यापक स्टीफन मिलनर यांना योगायोगाने एक ऐतिहासिक दस्तऐवज सापडला आहे. 500 वर्षांपूर्वीचे ते एक अटक वॉरंट आहे. तत्कालीन कुख्यात राजकीय विचारवंत निकोलो मॅकियाव्हेलीविरोधात ते जारी करण्यात आले होते. मॅकियाव्हेलीला अटक करण्याची घोषणा 1513 मध्ये झाली होती. त्याचे अध:पतन अणि मृत्यूसाठी तीच कारणीभूत ठरली.


प्राध्यापक स्टीफन हे फ्लोरेन्समधील संग्रहालयात दवंडी पिटणारे आणि घोषणा करणा-यांवर संशोधन करत होते. 1470 पासून 1530 पर्यंत जारी करण्यात आलेले शेकडो घोषणापत्र त्यांनी वाचले. हे अटक वॉरंट वाचल्यानंतर मी खुश झालो. कारण ते काय आहे हे मला कळले, असे स्टीफन म्हणाले. जगातील सर्वात प्रभावी राजकीय लेखकाच्या पतनाचे कारण ठरलेले हे दस्तऐवज असल्यामुळे स्टीफन यांचा आनंद स्वाभाविक आहे. राक्षसासाठी ‘मॅकियाव्हेली’ आणि ‘ओल्ड निक’ ही संबोधने तेव्हापासूनच वापरू जाऊ लागली. मात्र त्यामागे असलेल्या परिस्थितीकडे दुर्लक्ष केले जाते.


1512 मध्ये मेडिसी घराणे फ्लोरेन्सवर पुन्हा सत्तेत आले तेव्हा मॅकियाव्हेलीला प्रतिस्पर्र्धी समूहासोबत संबंध ठेवल्यामुळे तत्कालीन उच्च न्यायालयाने पदावरून हटवले होते. मेडिसींना नष्ट करणा-या षड्यंत्रातही मॅकियाव्हेलीचे नाव आले. त्यानंतर त्याच्याविरोधात जारी केलेले अटक वॉरंट प्राध्यापकांना संशोधनादरम्यान सापडले आहे.


इटलीतील राजकीय घडामोडींची माहिती असलेले इतिहासकार सांगतात की, अटक वॉरंट जारी करण्यात आले त्याच दिवशी मॅकियाव्हेलीला अटक करण्यात आली होती. त्याला टॉर्चर करून शहरापासून दूर नजरकैदेत ठेवण्यात आले. ‘अंधाराचा राजपुत्र’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या मॅकियाव्हेलीने त्यानंतर राजाला एक पत्र लिहिले, जेणेकरून मेडिसीकडून सुटके ची परवानगी मिळेल. पण ते पत्र नंतर वाचण्यात आल्याचे पुरावे नाहीत. या घटनेनंतर 14 वर्षांनी मॅकियाव्हेलीचा दारिद्र्यावस्थेने मृत्यू झाला.


telegraph.co.uk