आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हेलच्या शुभेच्छांनी लग्नाचा क्षण आणखी आनंदी बनवला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपले लग्न एखाद्या खास पद्धतीने करून हा क्षण संस्मरणीय करण्याचा अनेकांचा विचार असतो. पॅट्रिक आणि अमांडाने असाच विचार केला. अमेरिकेतील कनेक्टिकट येथे राहणाया पॅट्रिक आणि अमांडा यांनी विशेष पद्धतीने लग्न करायचे ठरवले. याच विचारातून दोघे मॅस्टिक अ‍ॅक्वेरियममध्ये पोहोचले. तेथे जुनो नावाचा 11 वर्षांचा नर व्हेल आहे. पॅट्रिक आणि अमांडाने जुनोसमोर लग्नाचा विधी पार पाडला. या वेळी जुनो त्यांच्या जवळ आला आणि हास्यरूपाने त्यांना शुभेच्छा दिल्या. जुनो हसत असतानाच फोटोग्राफरने हा क्षण कैद केला आणि हे लग्न संस्मरणीय बनले. अशा प्रकारे शुभेच्छा मिळाल्याने पॅट्रिक आणि अमांडादेखील खुश आहेत. जुनो नावाचा हा व्हेल मासा फार क्वचित क्षणी जवळ येऊन हसतो, असे मत्स्यालयातील अधिकायांनी सांगितले. मत्स्यालयातील सर्व कर्मचायांनी नवदांपत्याला शुभेच्छा दिल्या. जुनोची लांबी 11.9 इंच असून वजन 596 किलोग्रॅम आहे. फेसबुकवर त्याचे पेज बनलेले असल्यामुळे तो प्रसिद्ध आहे. मागील वर्षी या मत्स्यालयात आलेल्या पर्यटकाला जुनो एवढा आवडला की भेटल्यानंतर त्याने जुनोचे फेसबुकवर एक पेज तयार केले.