आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Madi A Miracle Man Said American MPs, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमेरिका दौरा: मोदी हे एक 'चमत्कारिक व्यक्ती' अमेरिकेच्या खासदारांचे गौरवोद्गार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क - अमेरिका दौ-यावर गेलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फक्त अनिवासी भारतीयांनाच नव्हे, तर अमेरिकेच्या ४० खासदारांना मंत्रमुग्ध केले. या खासदारांनी मोदींचे भाषण म्हणजे "प्रेरणादायी मोठे व्हिजन' संबोधले आहे. मेडिसन स्क्वेअरमध्ये आपल्या भाषणात मोदी यांनी "आपण एक सामान्य व्यक्ती असून चहा विकून इथपर्यंत पोहोचलो आहे. मात्र, सामान्यांसाठी मोठे काम करण्याचा आपला मनोदय आहे,' असे म्हटले होते. ही भावना ऐकण्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या अमेरिकेच्या खासदारांनी मोदी हे एक "चमत्कारिक व्यक्ती' असल्याचे म्हटले आहे. मोदींची भाषा जास्त समजली नसली तरी त्यांच्या हावभावावरून बरेच कळाले, अशी प्रतिक्रिया खासदारांनी व्यक्त केली आहे.

किमान शासनाच्या मोदींच्या संकल्पनेची अमेरिकेच्या खासदारांनी प्रशंसा केली आहे. "भारतीयांनी मोदींना का निवडून दिले हे आता समजले,' अशा शब्दांत जॉर्जियातील काँग्रेस सदस्या हेन्री सी हँक जॉन्सन यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

तुलसी अमेरिकेतील एकमेव हिंदू खासदार
अमेरिकी काँग्रेसमधील एकमेव हिंदू खासदार तुलसी गेबार्ड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यांनी या वेळी मोदींना भगवद्गीता भेट दिली. ही माझी भारताप्रती प्रेम दाखवण्याची पद्धत आहे, असे तुलसी म्हणाल्या. मोदी यांना अमेरिकेचा व्हिसा देण्याच्या मोहिमेत तुलसी आघाडीवर होत्या.

तुलसी यांनी मोदींना दिलेली गीता त्यांच्याकडे लहानपणापासून होती. त्यांनी अमेरिकी खासदारपदाची शपथ याच गीतेवर हात ठेवून घेतली होती.

अमेरिकेचे खासदार मोदींच्या प्रेमात
मेडिसन स्क्वेअरमध्ये मोदींनी आपल्या भाषणात योग्य विषयांवर भाष्य केले. त्यांच्यामुळे अमेरिका आणि भारताचे नाते आता एका वेगळ्या उंचीवर पोहोचले आहे. अशा ठिकाणी उपस्थित राहणे आणि अशा प्रकारच्या ऐतिहासिक कार्यक्रमाचा साक्षीदार बनणे माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे. भारत-अमेरिकेचे संबंध अधिक दृढ बनवण्याकरिता मोदी आणि त्यांच्या प्रशासनासोबत काम करण्यास मी उत्सुक आहे.
-ग्रेस मेंग, न्यूयॉर्कच्या काँग्रेस खासदार

त्यांच्याकडे एक परिपूर्ण दृष्टिकोन आहे. त्यांनी मेडिसन स्क्वेअरला एखाद्या रॉकस्टारप्रमाणेच गर्दीने फुलवून टाकले. -पेटे ओल्सन, टेक्सासचे काँग्रेस खासदार

भारतवंशीयांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे. अमेरिका आणि भारताचे संबंध पुनरुज्जीवित करण्यासाठी सोबत काम मिळून करण्याची मला अपेक्षा आहे.
-अ‍ॅमी बेरा, अमेरिकेचे खासदार

या कार्यक्रमासाठी मी व्योमिंगमधून आले होते. सामान्य लोकांसाठी मोठ्या गोष्टी करायच्या आहेत, असे जेव्हा मोदींनी उच्चारले तेव्हा खासदार त्यांच्याकडे आकर्षित झाले. ते सरकारला संचालकाच्या नव्हे तर सहायकाच्या दृष्टिकोनातून पाहतात. एक रिपब्लिकन या नात्याने मीसुद्धा अशाच भावनेवर विश्वास ठेवते. - सिंथिया ल्युमिन्स, काँग्रेस सदस्य

मेडिसन गार्डनवरील कार्यक्रम अद्भुत
मेडिसन गार्डनवर लोकांनी आयोजित केलेला कार्यक्रम अद्भुत होता. १८ हजार ५०० लोकांना भेटण्याचा हा एक अनोखा योग होता. मी यासाठी सर्वांनाच धन्यवाद देतो.
- नरेंद्र मोदी, ट्विटरवरून
पुढे वाचा....
अर्ध्याहून जास्त भारतीय अमेरिकी मायदेशात व्यापारास अनुत्सुक