Home »International »Other Country» Magazine Promises Pregnant Kate Photos, Angering UK Royals

केटच्या बिकिनीतील छायाचित्राने खळबळ; ब्रिटनचे राजघराणे नाराज

वृत्तसंस्था | Feb 14, 2013, 10:08 AM IST

लंडन - महाराणी एलिझाबेथची स्नूषा केट मिडिलटनचे बिकनीतील छायाचित्र प्रसिद्ध केल्यामुळे ब्रिटनचे राज घराणे नाराज आहे. इटालियन गॉसिप मासिक ‘ची’ने ही घोषणा केली आहे. चीने याआधी केटचे अर्धनग्न छायाचित्र प्रसिद्ध केले आहे.

केट पतीसोबत कॅरेबियन बेट मस्टिकमध्ये सुटीसाठी गेले आहे. प्रसिद्ध झालेले छायाचित्र या बेटावरील आहे. ची मासिकाने गेल्यावर्षी केटचे अर्धनग्न छायाचित्र छापले होते. त्या वेळी संबंधित जोडपे फ्रान्समध्ये सुटीसाठी आले होते. यानंतर खासगी आयुष्य व प्रसारमाध्यमांची सीमारेषा या मुद्दय़ावर वाद सुरू झाला. मासिकाचे मालक द मोनदादोरी समूहाने आपल्या वेबसाइटवर मासिकाचे मुखपृष्ठ अपलोड केले आहे. छायाचित्राचे शिर्षक, केट अँँड विल्यम इन मस्टिक, द केली ग्रोज असून त्यावर केटची बिकनीतील छबी आहे. येत्या जुलै महिन्यात केटची प्रसूती होणार आहे.

Next Article

Recommended