आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Magnetic Boot Issue At Washington, Divya Marathi

एक्स-मॅनसारखे बुट घाला आणि छतावर उलटे चाला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - ब्रिटनमधील एका आविष्कारकर्त्याने एक्स-मॅन शैलीतील चुंबकीय बुटांचा शोध लावला असून हे बुट घालून छतावर चक्क उलटे चालता येते.एक्स-मेनच्या मॅग्नोटोपासून प्रेरणा घेऊन कोलीन फुरेझ याने जुन्या बुटाच्या जोडीला छिद्र पाडून इलेक्ट्रोमॅग्नेटचे सोल बसवले. पण हे चुंबक वजन पेलण्यासाठी फारसे सक्षम नसल्याचे त्याच्या लक्षात आल्यानंतर तो भंगाराच्या दुकानात गेला. तेथून त्याने निकामी झालेल्या मायक्रोवेव्ह घेतल्या. मायक्रोवेव्हचे ट्रान्सफॉर्मर काढून त्यातील मॅग्नेटिक काइलमधून विद्युत प्रवाह सोडून पाहिला, हे कॉइल 80 किलो वजन पेलण्यास सक्षम असल्याचे त्याच्या लक्षात आले आणि छतावर उलटे चालण्याचे त्याचे स्वप्न साकार झाले.
खरेखुरे व्हॉल्वेरियन पंजे
फुरेझनेही खरेखुरे व्हॉल्वेरियन पंजे तयार केले. हातातील कळ दाबताच त्याला पायांची हालचाल सहजपणे करता येते आणि उलटे चालता येते.
चुंबकीय प्रवाहावर मदार
फुरेझने चुंबकाला जोडलेल्या पट्टय़ा बुटाला जोडल्या. दोन्ही बुटांसाठी दोन स्वतंत्र स्वीचेस तयार करण्यात आले. पाय उचलायचा झाला की त्या बुटातील चुंबक प्रवाह खंडित करायचा, तो पाय पुढे ठेवला की पुन्हा त्यात चुंबकीय प्रवाह सोडायचा असे एकापाठोपाठ एक दोन्ही पाय पुढे टाकत जाणे त्याला शक्य झाले आहे.
मॅग्नेटोची जादू
एक्स-मेन कॉमिक्समधला मॅग्नेटो हा मुख्य खलनायक आपल्या सार्मथ्याच्या बळावर इलेक्ट्रोमॅग्नेटिक क्षेत्रावर हुकुमत गाजवू शकतो आणि आपल्या इच्छेनुसार वस्तू फिरवू शकतो, त्यापासून प्रेरणा घेऊन फुरेझने हे बुट तयार केले.