आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Magnitude 5.1 Earthquake Shakes Los Angeles, US Geological Survey Says

अमेरिकेत 5.1 रिश्टर स्केलच्या भूंकपाने हादरले; सोशल मीडियात छायाचित्रे झाली व्हायरल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लॉस एंजिलिस- अमेरिकेतील लॉस एंजिलिस शहर शुक्रवारी 5.1 रिश्टर स्केल तिव्रतेच्या भूकंपाने हादरले. शहराच्या आग्नेय भागात 20 किलोमीटरवर भूकंपाचा केंद्र होता. विशेष म्हणजे भूकंपाचे जवळपास 40 धक्के जाणवले.

उत्तर ऑरेंज काउंटीमध्ये भूभाग 10 सेकंदापर्यंत हादरत होता. अनेक ठिकाणी घराच्या भींती कोळल्याच्या आणि वाहनांचे काच फुटण्याचे वृत्त आहे. अनेकांच्या घरातील फर्निचर आणि अन्य साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. तर काही ठिकाणी पाणी आणि गॅस लाइनचे नुकसान झाले आहे. मात्र यात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

भूकंपामुळे डिझ्निलँड तातडीने रिकामे करण्यात आले. बहुतेक सुपर मार्केट आणि मोगा स्टोअरमधील सामानाचे मोठे नुकसान झाले आहे.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा; सोशल नेटवर्किंग साइट्सवर व्हायरल भूकंपाचे छायाचित्रे...