आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थेम्सकिनारी महात्मा बसवेश्वरांचा पुतळा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन- बाराव्या शतकातील प्रसिद्ध भारतीय समाजसुधारक महात्मा बसवेश्वर यांचा अर्धाकृती पुतळा थेम्स नदीच्या काठी उभारण्यास ब्रिटिश सरकारने मंजुरी दिली आहे. लॅम्बेथचे माजी महापौर नीरज पाटील यांनी या मागणीसाठी सातत्याने पाठपुरावा केला, अशी माहिती ब्रिटनचे पर्यटन आणि सांस्कृतिक वारसा मंत्री जॉन पेनरोज यांनी दिली.ब्रिटनच्या सार्वजनिक पुतळे (नागरी) कायदा 1854 मधील तरतुदींनुसार पेन्निसिल्वानिया हाइट्स, 93 अल्बर्ट एम्बार्कमेंट, लंडन एसई 1 येथे महात्मा बसवेश्वरांचा अर्धाकृती पुतळा उभारण्यास हिरवा कंदील देण्यात आला आहे. पाटील यांची या ठिकाणी दोन चेहºयांचा महात्मा बसवेश्वरांचा अर्धाकृती पुतळा बसवण्याची योजना होती. त्यापैकी एका पुतळ्याचा चेहरा वेस्ट मिनिस्टर पॅलेसच्या दिशेने तर दुस-या पुतळ्याचा चेहरा वाऊहॉल प्लेजर गार्डनच्या दिशेने असणार होता. महात्मा बसवेश्वर यांनी गुलामगिरी व जातिप्रथेविरुद्ध लढा दिला होता, त्यासाठी त्यांनी आयुष्य वेचले, असे पाटील म्हणाले.