आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mahatma Gandhi Statue In South Koria, News In Marathi

दक्षिण कोरियात गांधीजींचा अर्धाकृती पुतळा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सेऊल- दक्षिण कोरियाच्या बुसान महानगरात राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे. शहराचे नवनिर्वाचित महापौर बेयाँग-सो सुह यांनी या पुतळ्याचे सोमवारी लोकार्पण केले. या वेळी दक्षिण कोरियातील भारताचे राजदूत विष्णू प्रकाश व इंडियन कौन्सिल ऑफ कल्चरल रिलेशन (आयसीसीआर)चे संचालक सतीश मेहता यांची उपस्थिती होती. या ब्रांझच्या पुतळ्याची निर्मिती प्रसिद्ध शिल्पकार गौतम पाल यांनी केली आहे. दक्षिण कोरिया व भारतातील सांस्कृतिक संबंधांच्या दृढीकरणासाठी हा पुतळा कोरियाचे सांस्कृतिक केंद्र असलेल्या बुसान येथे उभारण्यात आला असल्याचे विष्णू प्रकाश यांनी सांगितले.