आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Mahdi And Kurdish Ready To Collide With Isis, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इराकमध्‍ये धुमाकूळ घातलेल्या ISIS च्या दहशतवाद्यांना टक्कर देणार कुर्दिश आर्मी, वाचा आर्मीविषयी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क - इराकमध्‍ये इस्लामिक स्टेट इन इराक अँड अल-शाम ( आयएसआयएस)चे दहशतवादी सर्रास नागरिकांची कत्तल करित आहे. ती अनेक शहरे आपल्या नियंत्रणाखाली आणत आहेत. यामुळे कुर्दिश सुरक्षा दल इराकच्या कुर्दिस्तानची सुरक्षा व्यवस्था आणखी वाढवत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार आयएसआयएसबरोबर यशस्वी बोलणी करून इराकमधील हिंसा थांबवण्‍याकरिता कुर्दिश आर्मी महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

कुर्दिश सुरक्षा दल हे 'पेशमेर्गा' या नावाने ही ओळखले जाते. पेशमेर्गाचा अर्थ होतो, जो मृत्यूशी चार हात करतो. दुसरीकडे इराकचे सर्वाधिक प्रभाव असलेले धर्मगुरू मुक्तादा अल-सद्र यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत अनेक शिया मुसलान राष्‍ट्राच्या सुरक्षेचा संकल्प करित आहेत.

मेहदी आर्मीचे जवळ-जवळ 10,000 कमांडोज आयएसआयएसच्या दहशतवाद्यांशी लढण्‍यासाठी तयार आहेत. दुसरीकडे माजी हुकूमशाहा सद्दाम हुसैन यांच्या समर्थकांना मेहदी आर्मी पुन्हा एकत्र येईल याची भीती वाटत आहे. आधुनिक युध्‍द सामुग्रीने युक्त असलेल्या आर्मीला आपल्या देशाच्या भूमीवर अमेरिकी सैन्यांने येणे कदापि सहन होणार नाही. इराकमध्‍ये अमेरिकेच्या हल्ल्यापूर्वी आयएसआयएसच्या दहशतवाद्यांना मृत्यूवाट दाखवणार आहे, असे मेहदीच्या आर्मीमधील एका जवानांने सांगितले.

पेशमेर्गा आणि मेहदी आर्मीचा संक्षिप्त तपशील वाचण्‍यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा....