आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगभरात भीषण संहार करणा-या 'एके-47'चे कालश्निकोव काळाच्‍या पडद्याआड

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मॉस्‍को- जगातील सर्वात लोकप्रिय बंदूक एके-47 तयार करणारे रशियाचे बंदूकतज्‍ज्ञ मिखाईल कालश्निकोव यांचे निधन झाले. ते 94 वर्षांचे होते. त्‍यांनी बनविलेली एके-47 बंदूक जगभरात अतिशय लोकप्रिय आहे. अनेक दशांच्‍या लष्‍करात या बंदुकीचा वापर करण्‍यात येतो. कालश्निकोव यांना 'हिरो ऑफ रुस' या सन्‍मानाने गौरविण्‍यात आले होते.

कालश्निकोव यांना गेल्‍या महिन्‍यात रुग्‍णालयात दाखल करण्‍यात आले होते. त्‍यांनी दुस-या महायुद्धात जखमी अवस्‍थेत पहिल्‍या मशिन गनची रचना 1942 मध्‍ये तयार केली होती. तत्‍कालीन सोव्हीयत युनियनच्‍या लाल सेनेत टँक कमांडर म्‍हणून ते कार्यरत होते. त्‍यांनी तयार केलेली मशिन गन भविष्‍यात एके-47 म्हणून लोकप्रिय ठरली. लाल सेनेने 1947 पर्यंत या बंदुकीला लष्‍करात दाखल करुन घेतले होते.

एके-47 मशिन गनने आतापर्यंत भीषण रक्तपात केला आहे. या बंदुकीची मोठ्या प्रमाणात तस्‍करी होते. तसेच दहशतवाद्यांनाही एके-47 चा बेकायदेशीरपणे पुरवठा होतो. अनेक कारणांनी ही बंदूक लोकप्रिय ठरली. केळीच्‍या आकाराप्रमाणे या बंदुकीच्‍या गोळ्या आहेत. बंदुकीचा वापर आणि देखभाल अतिशय सुलभ आहे. कोणत्‍याही परिस्थितीत बंदूक काम करते. सध्‍या जगभरात 10 कोटी एके-47 मशिन गन असल्‍याचा अंदाज आहे.