आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maladiv's Former President Mohmad Nashid Arrested

मालदीवचे माजी राष्ट्राध्यक्ष मोहंमद नाशीद यांना अटक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माले - सत्तेच्या काळात न्यायाधीशांना अटक करण्याच्या प्रकरणात मालदीवचे माजी राष्ट्राध्यक्ष मोहंमद नाशीद यांना मंगळवारी अटक करण्यात आली. त्यांना बुधवारी न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. भारताच्या उच्चायुक्त कार्यालयात नाशीद अकरा दिवसांपासून आश्रयाला होते. तेथून बाहेर पडल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याविरुद्ध न्यायालयाने दोन अटक वॉरंट जारी केले होते. त्यानंतर त्यांची रवानगी पोलिस कोठडीत करण्यात आली, अशी माहिती राष्ट्राध्यक्ष मोहंमद वाहिद यांनी पत्रकार परिषदेत दिली. नाशीद यांना त्यांच्या घरातूनच अटक करण्यात आली. नाशीद यांच्यावरील कारवाईनंतर विरोधक आणि सत्ताधारी आमने-सामने आल्याने संघर्ष उडाला. त्यामुळे माजी राष्ट्राध्यक्षांच्या निवासस्थानाबाहेर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.

अटकेमागे राजकारण
आपल्यावरील कारवाईमागे राजकारण असल्याची टीका माजी राष्ट्राध्यक्ष नाशीद यांनी केली. देशात 7 सप्टेंबर रोजी राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक आहे. त्या निवडणुकीपासून रोखण्यासाठी ही अटक करण्यात आली आहे, असे 45 वर्षीय नाशीद यांचे म्हणणे आहे.