आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तालिबान्यांची शिकार झालेली मलाला पुन्हा शाळेत परतली

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाकिस्तानमध्ये तालिबान्यांच्या गोळ्यांची शिकार झालेली मलाला युसुफजाई आता पूर्णपणे बरी झाली असून ती ब्रिटनमध्ये शाळेत जायला लागली आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात १५ वर्षीय मलालावर शाळेतून घरी परतत असताना तालिबान्यांनी गोळीबार केला होता. तिच्या डोक्यात गोळ्या लागल्या होत्या. प्रथम पाकिस्तान आणि नंतर उपचारासाठी तिला ब्रिटनमध्ये हलविण्यात आले. ब्रिटनमधील क्विन एलिझाबेथ हॉस्पिटलमध्ये तिच्यावर उपचार करण्यात आले. सध्या ती तिथेच राहत आहे. मलालावर तालिबान्यांनी गोळीबार करण्याचे कारण तिने मुलींच्या शिक्षणाबद्दल आवाज उठवला होता. बीबीसी उर्दू साठी ती गुल मकई नावाने रोजनिशी (डायरी) लिहित होती. यामुळे तिचे नाव चर्चेत आले होते. या रोजनिशीच्या माध्यमातून मलाला स्वात खो-यातील जनजीवन बीबीसी उर्दूच्या माध्यमातून जगाच्या वेशीवर टांगत होती. आता तीने बर्निंगहमच्या अॅजबॅस्टन हायस्कूलमध्ये पुन्हा शिक्षण घेण्यास सुरुवात केली आहे. शाळेचा पहिल्या दिवस आपल्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा दिवस असल्याचे तिने नमुद केले आहे. ती म्हणते, मी पुन्हा शाळेत गेले, हा माझ्या आयुष्यातील सुखद क्षण आहे.